Ad will apear here
Next
How are you?
झेन गुरु सकाळी लवकर उठून शेतात काम करत होता. तिकडून विद्यार्थी सकाळच्या मेडिटेशनसाठी चालले होते. दरवेळी एक विद्यार्थी तिथून जात असेल तर, झेन मास्टर त्याला “गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?” असं विचारायचा.
प्रत्येक वेळी “गुड..” असं उत्तर देऊन तो विद्यार्थी पुढे जायचा. झेन गुरु सुस्कारा सोडून मान हताशपणे हलवून कामाला लागायचा.
पुढचा विद्यार्थी आला आणि झेन गुरुनं परत तोच प्रश्न विचारला. त्या विद्यार्थ्यानं आपली हॅट काढली, समोर ठेवली आणि आपण आनंदात आहोत असं दर्शवणारी एक नृत्यमुद्रा करुन दाखवली.
झेन गुरु स्मितहास्य करुन म्हणाला, व्वा, हे खूपच छान उत्तर आहे.
(१.कुवेतला आमच्या कंपनीत एक मार्केटिंगमधला अधिकारी होता. तो म्हणायचा, “इथे सकाळी घरी कुणाचा मृत्यू झाला असेल तरी आॉफिसमध्ये आल्यावर हाऊ आर यू या प्रश्नाला गुड असंच उत्तर दिलं जातं.. ”
२.एक कलाकार एका रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याला थांबला. तो कलाकार पाहून तीन चार माणसं त्याच्यामागे सेल्फी काढायला आली. काहींनी सह्या घेतल्या. मित्राला दुस-या दिवशी सांगताना तो कलाकार म्हणाला, “शंभर लोकांची रांग लागली माझ्यासोबत सेल्फी काढायला..” (हा प्रसंग मी स्वत: अनुभवलेला आहे.)
दिवसभरात “हाऊ आर यू” ला उत्तर देताना किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना आपण बेमालूमपणे त्यात खोट्याचा अंश मिसळत असतो. ही झेन कथा तेच सांगते आहे.. सच घटे या बढे तो सच ना रहे.. झूठकी कोई इंतिहा ही नहीं.)
नीलांबरी –
मूळ झेन कथा - How are you?
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZZFDX
Similar Posts
How are you ? झेन गुरु सकाळी लवकर उठून शेतात काम करत होता. तिकडून विद्यार्थी सकाळच्या मेडिटेशनसाठी चालले होते. दरवेळी एक विद्यार्थी तिथून जात असेल तर, झेन मास्टर त्याला “गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?” असं विचारायचा.
How are you? झेन गुरु सकाळी लवकर उठून शेतात काम करत होता. तिकडून विद्यार्थी सकाळच्या मेडिटेशनसाठी चालले होते. दरवेळी एक विद्यार्थी तिथून जात असेल तर, झेन मास्टर त्याला “गुड मॉर्निंग, हाऊ आर यू?” असं विचारायचा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language